Monday, 31 October 2011

                                                  श्री                                                3
राजेश्वरीचे सुस्पष्ट निर्भीड बोलणे या राजवाड्याला थोडे नवीन होते.राजघराण्यातल्या लोकांनी बोलायचे अन बाकीच्यांनी निमुटपणे ऐकायचे ही वर्षानुवर्षाची परंपरा आज पहिल्यांदाच मोडली होती.महाराजांना तर मुळीच आवडले नव्हते.राजेश्वरीने लगेचच राजांना खुलासा केला,महाराज आम्ही हातावर पोट असलेली गरीब माणसं आहोत थोडे दिवस राजमहालात राहून,तिथले सुग्रास अन्न खाऊन आम्हाला आमच्या सवयी बदलणे फारसे परवडणारे नाही.कृपा करून माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नये.माझ्या वडिलां बरोबर राहणे मला भाग आहे.कारण त्यांचे काम झाल्यावर ते इतके थकून जातात की त्यांना स्वतःचे जेवण स्वतः बनवणे शक्य होत नाही.आता खूप चालून आल्यामुळे माझे वडील थकले आहेत त्यांची तब्बेत पण तितकीशी बरी नाही पण आपणास दिलेला शब्द मोडायचा नाही म्हणून ते इथवर आले.गेले दोन दिवस आम्हाला काही खायला पण मिळाले नाही त्यामुळे त्यांना धड बोलताही येत नाही म्हणून मला इतकं बोलाव लागलं,काही चुकलं असेल तर क्षमा करा.आता महाराजांना वेगळ्याच काळजीने घेरले,आपण उगीच या माणसाच्या नादी लागलो .ह्याला एवढे मोठे काम पेलणे शक्यच नाही.अठरा लहान मोठ्या खोल्यांच्या राजवाड्याला हा कसं रंगविणार चित्र काढणं फार लांबची गोष्ट आहे.नाही याला परत पाठवावं हेच बरं!इतक्यात रघुनाथ उभा राह्यला अन म्हणाला महाराज आज मुहूर्ताचा दिवस आहे न मग कुठून सुरवात करू ते सांगा मी थोडं सामान बरोबर आणले आहे.
                                                         सौ.उषा.
                                                             

No comments:

Post a Comment