श्री
नरेंद्र दत्त म्हणजे आपले स्वामी विवेकानंद त्यांच्या लहानपणी पूर्ण नास्तिक होते.त्यांची आई शिव भक्त आणी खूप अन्नदान करणारी होती त्यामुळे त्यांच्या दारावर कायमच साधू संन्यासी यायचे, त्या प्रत्येकाला लहानगा नरेन विचारायचा तुम्ही देव पहिला आहे? त्यावर त्यांचे नकारार्थी उत्तर ऐकून नरेनला खूप राग यायचा तो म्हणायचा की जो देव तुम्ही पहिला नाही त्याच्या विषयी बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. खूप वर्षांनी तरुण नरेनला असा एक अधिकारी पुरुष भेटला ज्याच्या उत्तराने नरेंद्रच्या आयुष्यातली सगळी समीकरणेच बदलून गेली.रामकृष्ण परमहंस त्याला म्हणाले की मी देव बघितला आहे,तो माझ्याशी रोज बोलतो एवढेच नाही तर मी तुला सुद्धा देव दाखवू शकतो.असे परिपूर्ण उत्तर ऐकल्यावर नरेंद्र अगदी हरखून गेला,पुढे त्याने खूप मोठे कार्य केले जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.पण हा देव मी पहिला असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा माझ्यावर निश्चितच विश्वास बसणार नाही.असो मी उद्या तुम्हाला ती हकीकत सांगीन. आज एवढच पुरे . सौ.उषा.
No comments:
Post a Comment