श्री
पहाटेच्या या समयी म्हणा हरी हरी !भगवान गोपालकृष्णाच्या स्मरणाने आज दिवाळीतला एक महत्वाचा दिवस उगवला.नरकासुराच्या बंदिवासातून सोळा हजार राजकन्यांची कृष्णाने मुक्तता केली आणी त्यांच्याशी विवाह करून त्यांना समाजात एक प्रतिष्ठित स्थान मिळवून दिले तो हा नर्क चतुर्दशीचा दिवस ! आजच संध्याकाळी अमावस्या लागणार असल्याने लक्ष्मी पूजन पण आहे. अगदी लहान वयापासून आपण मनापासून पूजा करतो ती ही लक्ष्मीदेवी! पावलागणिक जिच्यावाचून आमचं अडतं ती ही लक्ष्मी !हिची स्तुती करताना एका स्तोत्रात म्हटलं आहे लाक्ष्मिमुळेच तुमच्या रूप,गुण ,कुल नव्हे एकूण तुमच्या अस्तित्वालाच हिच्यामुळे शोभा येते !तर अशी ही लक्ष्मी सन्मार्गाने धन कमविणाऱ्याकडे नारायणासहित गरुडावर बसून येते आणी सर्व प्रकारच्या सुख समृद्धीचा वर्षाव करते.अधर्माने धन कमविणाऱ्याकडे हीच लक्ष्मी घुबडावर बसून येते आणी त्या घरात मग शांतीचा,सुखाचा मागमूस उरत नाही.लक्ष्मीची खूप छान छान स्तोत्र आहेत पण सर्वाधिक प्रचलित श्रीसूक्ताने देवीला अभिषेक करण्याचाही प्रघात आहे.पूज्य डोंगरे महाराज म्हणायचे की लक्ष्मी माता है उसका उपयोग तो किया जा सकता है उपभोग नही!केवळ लक्ष्मीचे आणी गणेशाचे पूजन करण्यापेक्षा आधी गणेश पूजन करून मग नारायणासहित लक्ष्मीचे पूजन हे जास्त शास्त्र शुद्ध आहे.शंकराचार्य एकदा एका घरी भिक्षा मागायला गेले ,घरातल्या गृहिणीने मोठ्या दुक्खी अंतःकरणाने घरात असलेला एक आवळा त्यांना भिक्षा म्हणून दिला घरात बाकी काहीच नसल्याचे तिचे दुक्ख शिव अवतार शंकराचार्यानी ओळखले, तिचे उदार मन बघून त्यांनी तिथल्या तिथे एका अद्भुत स्तोत्राची रचना करून देवी लक्ष्मीची आळवणी केली आणी त्या घरात सुवर्णाची बरसात झाली.ते कनकधारा स्तोत्र म्हणून आपणपण देवीला म्हणूया "नमोस्तु हेमामबुजपिठीकाये नमोस्तु भूमंडलनायीकाये,नमोस्तु देवादिदयापराये,नमोस्तु शार्न्गयुध वल्लभाये" सर्वांना आरोग्य सुख समृद्धी श्री लक्ष्मी नारायणाचे कृपेने लाभो ही त्यांचे चरणी विनम्र प्रार्थना!
सौ.उषा.
No comments:
Post a Comment