Saturday, 1 October 2011
श्री
आज ललिता पंचमीची पूजा बऱ्याच लोकांकडे असते.देवीला दुधाचा,पंचामृताचा ,कुंकवाचा अभिषेक असे बहुदा पूजेचे स्वरूप असते.श्रीसूक्त नवरात्रात आजकाल बहुतेक सगळेच म्हणतात.आपली स्तोत्र जर आपण लक्षपूर्वक म्हंटली तर आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी,समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न हे सगळेच आपल्याला त्यात गुंफलेले आढळते.जाज्वल्य देशप्रेम सुद्धा आमची स्तोत्र आमच्याही नकळत आम्हाला शिकवितात.श्रीसूक्तात स्वतःकरता धनदौलत मागताना प्रार्थना असते "प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मीन कीर्ती मृद्धीददातुमे". ज्या राष्ट्रात मी उत्पन्न झालो त्या राष्ट्रात मला यश ,ऐश्वर्यं,समृद्धी तू प्रदान कर .किती सुंदर अर्थ आणी किती सुंदर मागणी.माझ्यावर यश ऐश्वर्य मिळविण्याकरता माझी मातृभूमी सोडायची वेळ येऊ नये.त्याच बरोबर मला मिळणाऱ्या यशावर समृद्धीवर माझ्याच देशबांधवांचा अधिकार असावा ही गर्भित मागणी .आजच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्व ह्या श्रीसूक्ताचे पठण करून यशस्वी आणी समृद्ध होऊ या.श्री ललिता देवीच्या चरणी माझे हे पुष्प.
सौ.उषा.
Subscribe to:
Posts (Atom)