Wednesday, 2 November 2011
श्री 5
रघुनाथ काहीच बोलत नाही असे बघून महाराज पुन्हा म्हणाले रघुनाथ इतक्या रात्री तुम्ही कुठे जाल,आज इथेच थांबा,उद्या सकाळी तुमची नीट व्यवस्था करू.राजेश्वरीकडे हलकाच कटाक्ष टाकून रघुनाथ म्हणाला की आम्हा दोघांना कृपा करून फक्त मोठे भांडे भरून गरम दूध दिले तरी चालेल.महाराजांची इच्छा प्रमाण मानून मी आजची रात्र इथे राह्यला तयार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी रघुनाथ राजेश्वरीला घेऊन महाराजांपुढे हजर झाला.रघुनाथने महाराजांना सांगितले की त्याला आता चित्रांकरता रंग नव्याने तयार करावे लागतील आणी त्या करता त्याला गावाबाहेर जागा मिळाली अन ती देखील जंगलाला लागून तर ते फारच सोयीचे होईल.जास्त प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा आपणच खुलासा करण्यावर रघुनाथचा विश्वास होता म्हणून त्याने लगेच सांगितले की जंगलात वेगवेगळ्या रंगांची फुले असतात अन त्यांचा पक्का रंग तयार करण्यात छान उपयोग होतो,तसेच स्थानिक लोकांना या सगळ्याचा काहीच त्रास होत नाही.
महाराज विचारात पडलेले पाहून त्यांचा जुना सेवक हलक्या आवाजात म्हणाला की महाराज आपला जुना राजवाडा रिकामाच पडला आहे अन तो जंगलाच्या जवळ पण आहे.महाराजांनी एक रागीट कटाक्ष सेवकावर टाकला अन प्रत्यक्षात ते रघुनाथला म्हणाले की अशी जागा काही सुंदरपुरात नाही.महाराणी सुलक्षणा इतक्यावेळ गप्प राहून सगळा संवाद ऐकत होत्या पण आता मात्र त्यांना राहवेना.त्या महाराजांना म्हणाल्या की रघुनाथ त्यांच्या प्रीय मित्राने पाठवलेला विश्वासू माणूस आहे तेव्हा त्याच्यापासून दडवून ठेवण्यात काही हशील नाही।
सौ.उषा.
सौ.उषा.
Subscribe to:
Posts (Atom)