Thursday, 20 October 2011
श्री
दीदींच्या प्रश्नाला मी जे उत्तर दिले की आम्ही रिक्षाने आलो त्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवली म्हणाल्या " उषा तुम्हे शायद taxi कहना है" त्यावर मी त्यांचा हात धरून त्यांना खिडकी जवळ नेले व झाडाखाली उभा असलेला रिक्षा दाखवला त्या एवढच म्हणाल्या तुम सचमुच बहोत थक गई हो आओ खा पीकर सो जावो कल सबेरे बात करेंगे.मी आता मात्र खूप जोरात मान हलवून त्यांना सांगितलं की मी निव्वळ नाईलाज म्हणून आले आहे,कृपा करून माझं नागपूरच परतीच ticket द्या अन मी ताबडतोब इथून जाते.त्यानी दिलेलं सरबत फक्त आम्ही घेतलं काहीही खाण्याची इच्छाच उरली नव्हती.आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.दिदींनी खिडकीतून हात हलवून आम्हाला निरोप दिला त्याची मला गंमतच वाटत होती.पुन्हा तीच उसाची शेतं,तोच घुंगरांचा आवाज,तेच सुंदर तरीही भीतीदायक चांदणं,आणी तीच विचित्र शांतता !रिक्षा वाला बहुदा मुका असावा कारण तो एकही शब्द बोलत नव्हता आमच्या कुठल्याच प्रश्नाचं त्याने काहीही उत्तर दिले नव्हते,अर्थात आम्हाला त्याच्या मूक बधीर असण्यापेक्षा इथून सही सलामत घरी जाण्याच्या काळजीने जास्त घेरले होते.आम्ही त्या चहापानाच्या टपरी जवळ आलो हे आम्हाला खरच वाटत नव्हतं.म्हंटल ह्या रिक्षावाल्याला ठरल्या पेक्षा जरा जास्त पैसे देऊ रिक्षातून उतरल्यावर बाळाला बाबांजवळ दिलं,आतापर्यंत छातीशी दडवून ठेवलेल्या पैशाच्या पाकिटातून पैसे काढले आणी त्याला द्यायला गेले तर अरेच्या हा एका मिनिटात गेला तरी कुठे ,सगळीकडे शोधक नजर टाकली कुणीच नव्हतं ,अंगावर एक शहारा आला घाबरतच टपरीवर विचारलं की "भैया वो रिक्षावाला कहा गया हमे उसके पैसे देने है अजीब है पैसे की भी फिकर नही."त्यावर टपरीवाला म्हणाला दीदी मै कई सालो से ये टपरी चला रहा हू और मै आपको विश्वास दिलाता हू की इस रास्तेपर आजतक किसीने कोई रिक्षा नही देखा.इतनी रात को यहासे कोई जाता भी नही ये वोही रास्ता है जिसके बारेमे आयेदिन अखबार में स्त्रीयोसे छेडछाड और खून की खबरे छ्पती रहती है .मी नकळत माझ्या पतीचा हात घट्ट धरला एक थंड शहारा पुन्हा शरीरभर पसरला .एवढ्यात काशीकडे जाणारी शेवटची बस आली आम्ही घाई घाईने आत चढलो चालक अन वाहक ह्यांच्या शिवाय बस मध्ये कुणीच नव्हतं.टपरीवाल्याचा आवाज खूप दुरून कानात घुमत होता "आपलोग बहोत भाग्यवान हो जो काशी विश्वनाथ ने आपको दर्शन दिये और इस भयंकर सडक पर आपकी रक्षा की!"
सौ.उषा.
Subscribe to:
Posts (Atom)