Monday, 17 October 2011
USHA: ...
USHA: ...: श्री आम्हा सर्व हिंदूंना जी यात्रा आयुष्यात एकदातरी घडावी अशी काशीयात्रा मला चक्क तीन...
श्री
आम्हा सर्व हिंदूंना जी यात्रा आयुष्यात एकदातरी घडावी अशी काशीयात्रा मला चक्क तीनदा घडली ही माझ्यावर देवाची विशेष कृपा असं मी तरी मानते. काशीला माझा मामा रेल्वेत deputation वर गेला होता त्यामुळे राहण्याची व्यवस्था उत्तम होती.माझे पति आणी दोन महिन्यांची माझी मुलगी असे आम्हीं काशीला गेलो होतो.गेल्या गेल्या मामानी मला बजावलं तू कुठेही जा पण सातच्या आत घरात दिसली पाहिजे.इथे सध्या तरुण मुलींचे दागिने हिसकावून त्यांना भ्रष्ट करून त्यांच्या बरोबरच्या पुरुषाला ठार मारून टाकले अश्या बऱ्याच घटना एवढ्यात घडल्या आहेत .मी काशीला telephone exchange ला माझ्या एका वरिष्ठांना भेटायला गेले,त्यांनी त्यांच्या घरी येण्याचा खूप आग्रह केला मी नाही म्हणते आहे बघितल्यावर त्यांनी माझे परतीचे ticketच काढून घेतले आणी ते त्यांच्या घरी गेल्यावर मिळेल असेही सांगितले.बर आता उद्या भेटूया तुम्हालाही तुमची कामं असतील न !
सौ.उषा.
Subscribe to:
Posts (Atom)