Sunday, 2 October 2011
श्री
या देवी सर्व भूतेषु क्षुधा,रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः सर्व जीव मात्रांच्या ठिकाणी भूक तहान निद्रा या भावनांची तीव्रता एकसारखीच असते.त्यांच्या या गरजा सारख्याच असतात हे लक्षात घेऊन आपण आपल्या आवाक्यात असणारी मदत जर देऊ केली तर ती जगन्माता आपल्यावर निश्चितच प्रसन्न होईल यात संशय नाही.पण मनुष्य जन्म घेतल्यावर आपण याही पलीकडे जाऊन विचार करावा असं शंकराचार्यांना वाटतं.ते त्यांच्या अन्नपूर्णा स्तोत्रात जगदंबेला काय मागतात ते बघण्या सारखे आहे.ते म्हणतात
"अन्नपूर्णे सदा पुर्णे शंकरप्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्द्यर्थम भिक्षां देहि च पार्वती".ज्ञान वैराग्य हे मनुष्य जन्माचे अंतिम उद्दिष्ट आहे पण आमचा सर्व वेळ निरर्थक गोष्टींमध्ये जातो.फारच कमी लोक ह्या अंतिम ध्येया पर्यंत जाऊन पोचतात.शेवटच्या घटके पावेतो आम्हाला या सगळ्यात गुंतून पडायला फार आवडते.जबजागो तब सबेरा अशी हिंदीत म्हण आहे.आपण पण अन्नपूर्णेला म्हणूया ज्ञान वैराग्य सिद्द्यर्थम भिक्षां देहि च पार्वती.
सौ.उषा.
Subscribe to:
Posts (Atom)