Sunday, 23 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री दिवाळीच्या शुभेच्छा मी रोजच दिवाळी संपेपर्यंत देणार कारण प्रत्य...

USHA:                                 श्री सर्वप्रथम सगळ...

USHA: श्री सर्वप्रथम सगळ...: श्री सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !उद्यापासून चार पाच दिवस तुम्ही कदाचित इतके busy व...
                                                                  श्री 
दिवाळीच्या शुभेच्छा मी रोजच दिवाळी संपेपर्यंत  देणार कारण प्रत्येक व्यक्ती वेग वेगळ्या वेळेस माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करेल ह्याची मला जाणीव आहे.सगळ्यांच्या आरोग्याची,बुद्धीची,धनाची,कल्याणाची आणी रक्षणाची प्रार्थना केल्यावर मन कसं प्रसन्न होऊन जातं.आपण जे दुसऱ्याला देतो ते सव्याज आपल्याला परत मिळतं हा निसर्ग नियमच आहे. आपलं लहानसं जीवन आनंदाने भरून जावे असे वाटत असेल तर सर्वांच्या उत्कर्षाची अभिलाषा धरा.फक्त स्वतः पुरतं मागण्याचा हव्यास देवाला पण रुचत नाही.अश्या प्रार्थनांचा तो अजिबात स्वीकार करत नाही.निसर्ग आम्हाला सदैव उत्तुंग स्वप्न पाहायला शिकवतो .समुद्र,डोंगररांगा,हिरवळ,नद्या कोणीच कोतेपणा शिकवत नाही.आपल्याजवळ असलेलं भरभरून वाटणं हा ह्यांचा सहज स्वभाव हातचं राखून कोणीच देत नाही,मग ह्या निसर्गाचा एक भाग असलेला माणूस तेवढा कोता का वागतो ? पण दिवाळी सारखा सण आला की सगळ्यांनाच उत्साह येतो.सगळे एकमेकांना खूप शुभेच्छा देतात त्यामुळे सगळ्या वातावरणात आनंदलहरी पसरतात आणी म्हणूनच आपणा सगळ्यांना हा सण मनापासून आवडतो .
                                                             सौ.उषा.