Monday, 24 October 2011
श्री
खूप वर्षापूर्वी दिवाळीच्या थोड्या आधी मी आमच्या नवीन शेजाऱ्यांना सांगितलं की तुमचं घराचं काम दिवाळीत कृपा करून बंद ठेवा तर त्यांनी ताबडतोब मान हलवून रुकार दिला मला हायसं वाटलं कारण गेले कित्येक दिवस त्यांच्या घराच्या बांधकामामुळे आमच्या अंगणात केव्हा काय येऊन पडेल याचा काही नेम नव्हता.नर्क चतुर्दशीच्या दिवशी सकाळी मी आणी माझ्या मुलीनी म्हणजे कल्याणीनी अंगणात सव्वीस थेम्बी सव्वीस ओळी अशी भली मोठी रांगोळी काढली रंग भरले तृप्त नजरेनी आपली रांगोळी न्याहाळली आणी दुसऱ्या कामाला वळलो.साधारण दहाच्या सुमारास बेल वाजली म्हणून दार उघडायला गेले आणी समोरचे दृश बघून रागवू नाही म्हटल तरी खूप राग आला आमच्या रांगोळीवर सिमेंट रेती विटांचे तुकडे ह्यांचा खच पडला होता.एक वेगळीच रांगोळी ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आमच्या पुढे साकारली होती.थोड्याच वेळात आमचे ते शेजारी आले अन मी त्यांना रांगोळी दाखवून रागानेच विचारले आपको बताया था फिरभी आपने हमारी रांगोली मिटाने मे कोई कसर नहि छोडी त्यावर ते निरागसपणे म्हणाले आपने तो दिवाली के दिन के बारे मे बोला था और मुझे याद भी है ,हम भी तो हिंदू हैं लक्ष्मी पूजा कल है भाभी !झालं एव्हढ म्हणून ते निघून गेले,मी कपाळावर हात मारून घेतला अन मग विचार करू लागले तो लक्षात आले की साग्र संगीत दिवाळी फक्त आम्ही मराठी माणसच साजरी करतो,बाकी सगळ्यांना दिवाळी म्हणजे लक्ष्मी पूजनच अभिप्रेत असतं ! असो ,आज भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अवतरले तो सुदिन .जगातील पहिला डॉक्टर हातात शंख चक्र अमृतकलश आणी जालोका घेऊन अवतरला कुठल्याही काळात सहज उपलब्ध हानिरहित औषधाचा अमृत साठा घेऊन धन्वंतरी आले आणी त्यांचे एकापेक्षा एक वरचढ शिष्य ह्यांनी सगळ्या जगाला निरोगी जीवनाच्या सोप्या युक्त्या सांगितल्या म्हणून आपण आजच्या दिवशी त्यांचे विशेष स्मरण करतो.काही लोक आज पण लक्ष्मी पूजा करतात .घरात समृद्धी रहावी म्हणून एखादी वस्तू आजच्या दिवशी विकत घेण्याचा पण प्रघात आहे.पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
सौ.उषा.
Subscribe to:
Posts (Atom)