Monday, 3 October 2011

                                                                 श्री 
आज श्री महासरस्वतीची पूजा !साहित्य संगीत नृत्य चित्रकला किती नावं घेणार थोडक्यात म्हणजे सर्वच क्षेत्रातल्या माणसांनी या देवीची उपासना केली पाहिजे.सर्व विद्धयांची अधिष्ठात्री ही देवी सरस्वती भक्तांना सहज प्रसन्न होते.वीणावादिनी   वर दे म्हणून भक्तांनी फक्त हाक मारायचा अवकाश ही देवी साक्षात दर्शन देते.भगवतीच हे सगळ्यात सौम्य आणी विलोभनीय रूप आहे.शुभ्र वस्त्रा शुभ्र फुलांनी प्रसन्न होणारी ही शारदा प्रगट होते ती निरनिराळ्या कलांच्या आनंददायी अविष्कारानी.सर्व कलाकार जिच्या कृपेची अभिलाषा धरतात अश्या या शारदेला आपण पण विनवुया "नव गति नव लय ताल छंद नव नवल कंठ नव जलद मंद्र रव नव नभ के नव विहग वृंद को नव पर नव स्वर दे वीणावादिनी वर दे" ! देवी सरस्वतीच्या चरणी माझे हे पुष्प अर्पण.

No comments:

Post a Comment