श्री
नवरात्र संपलं आज विजयादशमी !पराक्रमाची पूजा करायची हे आम्हाला लहापणापासून शिकविले जाते.राम कृष्ण शिवाजी राणा प्रताप झाशीची राणी अहो किती नावे घेणार ह्या सगळ्यांच्याच गोष्टी आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आणी म्हणूनच काहीही नातं नसताना आम्ही सचिनच्या शतकाने आनंदित होतो,त्याला भारतरत्न मिळावं म्हणून अभियान चालवतो,अमिताभ अजूनही तरुणांना मागे टाकून आघाडीवर असल्याचे आम्हाला कौतुक वाटते.पराक्रम करण्याकरता प्रत्येक वेळेस युद्धभूमीच हवी असं काहीही नाही.ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्याच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करायला भरपूर वाव आहे हे लक्षात ठेवले की आपल्या कामगिरीची सीमारेषा संकुचित राहणार नाही.विजयलक्ष्मी हेही देवीच एक रूप आहे तिच्या चरणी माझे हे पुष्प.
No comments:
Post a Comment