Friday, 28 October 2011

 
आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच नात्यांना एक वेगळाच गोडवा आहे,मान आहे,हळुवार जपणूक आहे.आपण कोरडे दिवस सेलिब्रेट करत नाही.आई वडील वृद्धाश्रमात आणी मुलं mothers day fathers day सेलिब्रेट करताहेत अस नाही.बहीण भावाच्या अनेक सुंदर कथा आमच्या चित्रपटातून आलेल्या आहेत.कृष्ण द्रौपदी ही जोडी तर आपल्या सगळ्यांची आवडती आहे.श्यामची आई या चित्रपटात एक सुंदर गीत होत "भरजरी  ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण "बहिणीने भावाच्या दीर्घायुष्या बद्दल देवाजवळ प्रार्थना करावी,त्याला गोड धोड खाऊ घालावे आणी भावाने संकट समयी तिचे रक्षण करावे असा मोठा गोड करार आहे.ज्या मुलीला भाऊ नाही तिची पण आमच्या पूर्वजांनी सोय केली आहे ,चंद्राला ओवाळले की झाली भाऊबीज साजरी !पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
                                                                                     सौ.उषा.

No comments:

Post a Comment