USHA: श्री
...: श्री ह्याच्या पुढची कथा usha-ushagmailcom.blogspot.com वर वाचा
Wednesday, 2 November 2011
श्री 5
रघुनाथ काहीच बोलत नाही असे बघून महाराज पुन्हा म्हणाले रघुनाथ इतक्या रात्री तुम्ही कुठे जाल,आज इथेच थांबा,उद्या सकाळी तुमची नीट व्यवस्था करू.राजेश्वरीकडे हलकाच कटाक्ष टाकून रघुनाथ म्हणाला की आम्हा दोघांना कृपा करून फक्त मोठे भांडे भरून गरम दूध दिले तरी चालेल.महाराजांची इच्छा प्रमाण मानून मी आजची रात्र इथे राह्यला तयार आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी रघुनाथ राजेश्वरीला घेऊन महाराजांपुढे हजर झाला.रघुनाथने महाराजांना सांगितले की त्याला आता चित्रांकरता रंग नव्याने तयार करावे लागतील आणी त्या करता त्याला गावाबाहेर जागा मिळाली अन ती देखील जंगलाला लागून तर ते फारच सोयीचे होईल.जास्त प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा आपणच खुलासा करण्यावर रघुनाथचा विश्वास होता म्हणून त्याने लगेच सांगितले की जंगलात वेगवेगळ्या रंगांची फुले असतात अन त्यांचा पक्का रंग तयार करण्यात छान उपयोग होतो,तसेच स्थानिक लोकांना या सगळ्याचा काहीच त्रास होत नाही.
महाराज विचारात पडलेले पाहून त्यांचा जुना सेवक हलक्या आवाजात म्हणाला की महाराज आपला जुना राजवाडा रिकामाच पडला आहे अन तो जंगलाच्या जवळ पण आहे.महाराजांनी एक रागीट कटाक्ष सेवकावर टाकला अन प्रत्यक्षात ते रघुनाथला म्हणाले की अशी जागा काही सुंदरपुरात नाही.महाराणी सुलक्षणा इतक्यावेळ गप्प राहून सगळा संवाद ऐकत होत्या पण आता मात्र त्यांना राहवेना.त्या महाराजांना म्हणाल्या की रघुनाथ त्यांच्या प्रीय मित्राने पाठवलेला विश्वासू माणूस आहे तेव्हा त्याच्यापासून दडवून ठेवण्यात काही हशील नाही।
सौ.उषा.
सौ.उषा.
Tuesday, 1 November 2011
श्री 4
रघुनाथचे बोलणे ऐकून महाराजांना नवल वाटले हा माणूस आहे तरी कसा? बर ह्याला आज मुहूर्ताचा दिवस आहे हे कुणी सांगितलं !महाराज काही उत्तर देणार इतक्यात त्यांची लाडकी नात सुवर्णरेखा धावतच त्यांच्या जवळ आली.तिचा घामेघूम झालेला चेहेरा महाराजांनी दोन्ही हातात धरून प्रेमाने कुरवाळला अन अलगद पुसून काढला.एव्हाना राजकन्या त्यांच्या मांडीवर चढून बसली होती.तिने समोर उभ्या असलेल्या दोन नवीन माणसांना बघितलं आणी ती जोरात ओरडली किती घाणेरडी,कळकट माणसे आहेत ही.आधी ह्यांना बाहेर घालवा.ह्या मळके कपडे घातलेल्या माणसांकडे मला अजिबात बघायचे नाही.महाराज सुदर्शन तिला समजावण्याच्या स्वरात म्हणाले हे छान चित्र काढतात त्यांना मुद्दाम आपल्या राजमहालाच्या रंगकामात मदत करण्याकरता बोलावले आहे.सुवर्णरेखा पुरेश्या अविश्वासाने त्यांच्याकडे बघून म्हणाली महाराज मला नाही वाटत ह्यांना चित्र बित्र काढता येईल.रघुनाथ हलक्या आवाजात म्हणाला राजकन्येनी आम्हाला एक संधी देऊन बघावी नाहीच आवडले तर आम्ही परत जाऊ.महाराजांना पण हायसे वाटले.गणपतीच्या चित्राने सुरुवात करावी यावर सगळ्यांचेच एकमत झाले.रघुनाथला देवाची खोली दाखविण्याकरता एक सेवक पुढे झाला.महाराजांना नमस्कार करून रघुनाथ आणी सगळे समान उचलून राजेश्वरी त्याच्या पाठोपाठ निघाली.महाराज थोडे अस्वस्थ झाले पण आता त्यांनी थोड्यावेळ चूप बसून काय होते ते बघण्याचा निर्णय घेतला.प्रशस्त देवघर त्यात देवांच्या असंख्य मूर्ती !राजेश्वरी स्वतःशीच हसली.राजपुरोहितानी ब्राम्हणांच्या मदतीने देव्हारा सकाळीच खोलीच्या मध्ये ओढून ठेवला होता ,नेहेमीच मुहूर्त देवघरापासून होत आला होता त्यामुळे सगळी जय्यत तयारी होती.रघुनाथच्या अंगात एकदम शक्ती संचार झाल्याप्रमाणे त्याने सामानाची मांडणी करून एकदा सगळे सामान बरोबर आहे की नाही ते बघितले,खुशीत हसून त्याने देवघरामागची भिंत खरवडून काढली.सगळी भिंत एकसारखी करण्यात त्याला राजेश्वरीने हातभार लावला.सर्व सेवकांना रघुनाथने बाहेर जायला सांगितले,राजेश्वरीने बरोबर आणलेला पडदा दाराला लावून बंदिस्त केले,ही रघुनाथची नेहेमीचीच पद्धत होती.चित्र पूर्ण झाल्याशिवाय तो कुणालाही ते बघू देत नसे.सगळ्या वाड्यात एक विचित्र कुतूहल दाटून राह्यले होते.महाराजांनी सक्त ताकीद दिली होती की कितीही उशीर झाला तरी चित्र पूर्ण झाल्यावर आम्हाला ते दाखविण्यात यावे.रात्री अकरा वाजता महाराजांना चित्र पूर्ण झाल्याचा निरोप मिळाला.महाराज जागेच होते,ते लगेचच निघाले,महाराणी सुलक्षणा पेंगुळलेल्या राजकन्येला सावरत लगबगीने निघाल्या.देवघर मोठ मोठ्या समयांच्या उजेडाने भरून गेले होते.एका बाजूला रघुनाथ आणि राजेश्वरी उभे होते.महाराज देवघराच्या दारात आले अन त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.साक्षात कैलासच अवतरला आहे की काय!बर्फाचा पहाड त्यावर शंकर पार्वती अन त्यांच्या मांडीवर गजानन !वा अति सुंदर अप्रतिम!महाराजांचे कुलदैवत शंकर पार्वती पण अनायासेच साकार झाले होते.महाराज गहिवरून म्हणाले रघुनाथ,महाराज वीरसिंगानी तुमची थोडी कमीच तारीफ केली असं आता आम्हाला वाटतंय.आता आम्ही तुमचं काही ऐकणार नाही तुम्हाला आमच्या वाड्यावरच राहावे लागेल आणी हो तुमच्या राजेश्वरीला आम्ही राहण्याची परवानगी देतो आहोत.
सौ.उषा.
Monday, 31 October 2011
श्री 3
राजेश्वरीचे सुस्पष्ट निर्भीड बोलणे या राजवाड्याला थोडे नवीन होते.राजघराण्यातल्या लोकांनी बोलायचे अन बाकीच्यांनी निमुटपणे ऐकायचे ही वर्षानुवर्षाची परंपरा आज पहिल्यांदाच मोडली होती.महाराजांना तर मुळीच आवडले नव्हते.राजेश्वरीने लगेचच राजांना खुलासा केला,महाराज आम्ही हातावर पोट असलेली गरीब माणसं आहोत थोडे दिवस राजमहालात राहून,तिथले सुग्रास अन्न खाऊन आम्हाला आमच्या सवयी बदलणे फारसे परवडणारे नाही.कृपा करून माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नये.माझ्या वडिलां बरोबर राहणे मला भाग आहे.कारण त्यांचे काम झाल्यावर ते इतके थकून जातात की त्यांना स्वतःचे जेवण स्वतः बनवणे शक्य होत नाही.आता खूप चालून आल्यामुळे माझे वडील थकले आहेत त्यांची तब्बेत पण तितकीशी बरी नाही पण आपणास दिलेला शब्द मोडायचा नाही म्हणून ते इथवर आले.गेले दोन दिवस आम्हाला काही खायला पण मिळाले नाही त्यामुळे त्यांना धड बोलताही येत नाही म्हणून मला इतकं बोलाव लागलं,काही चुकलं असेल तर क्षमा करा.आता महाराजांना वेगळ्याच काळजीने घेरले,आपण उगीच या माणसाच्या नादी लागलो .ह्याला एवढे मोठे काम पेलणे शक्यच नाही.अठरा लहान मोठ्या खोल्यांच्या राजवाड्याला हा कसं रंगविणार चित्र काढणं फार लांबची गोष्ट आहे.नाही याला परत पाठवावं हेच बरं!इतक्यात रघुनाथ उभा राह्यला अन म्हणाला महाराज आज मुहूर्ताचा दिवस आहे न मग कुठून सुरवात करू ते सांगा मी थोडं सामान बरोबर आणले आहे.
सौ.उषा.
Sunday, 30 October 2011
USHA: USHA: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकड...
USHA: USHA: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकड...: USHA: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्... : USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच ना... : आज भाऊबीज बहि...
श्री 2
महाराज सुदर्शन रघुनाथच्या भेटीची वाट पहात होते कारण आज रंगकामाला चांगला दिवस असल्याचे त्यांच्या राजगुरूंनी सांगितले होते.आज मुहूर्त जरी झाला तरी चालणार होते.दुपारी दोनच्या सुमारास रघुनाथ सुंदरपुरात दाखल झाल्याचे त्यांना कळले.स्नान वगैरे आटपून रघुनाथ महाराजांच्या भेटीला हजर झाला.सुदर्शन महाराज रघुनाथला बघून थोडेसे खट्टू झाले होते कारण रघुनाथचे उतरलेले खांदे जास्त वाईट दिसतात की त्याच्या चेहेऱ्यावरचे निर्विकार भाव जास्त अस्वस्थ करतात ह्याचा विचार करायला पण त्यांना त्रास होत होता त्यात भरीस भर म्हणून रघुनाथच्या बरोबर एक २० २२ वर्षाची मुलगी पण होती आणी तिला आणायची परवानगी पण रघुनाथने घेतली नव्हती.त्याच्या एकूण व्यक्तिमत्वा बद्दलच महाराजांना शंका वाटू लागली होती,पण शंका घ्यायला वाव पण नव्हता कारण रघुनाथ त्यांच्या परम मित्राने पाठविलेला माणूस होता.शेवटी महाराजांनी रघुनाथला काही गोष्टी खडसावून सांगायचा,विचारायचा निश्चय केला.महाराज म्हणाले की रघुनाथचे सुंदरपुरात स्वागत आहे पण त्यांच्या बरोबर आलेल्या मुलीला इथे राहू दिले जाणार नाही,एकतर तिच्याबद्दल कुठलीच पूर्व परवानगी न घेता तिला इथे आणले गेले.आणी दुसरे म्हणजे बरोबर कुणी नातेवाईक आहे म्हटल्यावर त्यांच्यात गुंतून कामात चालढकल होणे महाराजांना मुळीच चालणार नव्हते.रघुनाथने महाराजांचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले अन मग तो निर्णायक बोलल्याप्रमाणे म्हणाला "महाराजांचे चरणी माझा दंडवत!ही माझी एकुलती एक मुलगी राजेश्वरी आम्हा दोघांना एकमेकांशिवाय कुणीही नाही,शिवाय ही माझ्या जेवण्या खाण्याचे पण बघते".आता मात्र महाराजांना हसूच आले भोवतीचे सेवक पण हसू लागले.महाराज म्हणाले "रघुनाथ राजवाड्यात रोज कित्येक लोकांचा स्वैपाक होतो त्यात एकट्या रघुनाथच्या जेवण्याची नक्की सोय होईल,फक्त खाण्याचीच नाही तर राहण्याची सुद्धा सोय केली जाईल."रघुनाथने जोरात मान हलवून नकार दिला त्याला खोकल्याची उबळ आली होती.एवढ्यावेळ पुतळ्या सारखी उभी असलेली राजेश्वरी झटकन पुढे झाली,तिने वडलांना कसलेसे औषध दिले थोड्या वेळाने रघुनाथ स्वस्थ झाला असे बघून,राजेश्वरीने महाराजांना नमस्कार केला आणी म्हणाली "महाराज आपण फक्त माझ्या वडलांची राजवाड्याबाहेर कुठेतरी राहायची सोय करा आणी त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून थोडा शिधा ध्यावा जेणेकरून मी त्यांना स्वैपाक करून जेवू घालू शकेन.माझ्या जेवणाची सोय देव नक्कीच करेल !
सौ.उषा.
Saturday, 29 October 2011
USHA: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्...
USHA: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्...: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच ना... : आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच नात्यांना एक वेगळाच गोडवा आह...
श्री 1
दिवाळीची गडबड संपली अन वातावरणात एक प्रकारचा शिथिलपणा आला
उरलेला फराळ अन फटाके संपविले जातील म्हणा.आपण सगळ्यांनीच खूप आनंद घेतला दिवाळीच्या दिवसांचा हा आनंद पुढे वृद्धिंगत करण्याकरता मी आजपासून तुमच्या करता एक नवीन आनंद घेऊन आले आहे.आपणा सगळ्यांना लहानपणापासून ऐकायला आवडते ती गोष्ट खूप दिवस पुरेल अशी कथा मी आजपासून तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे.कथा अर्थातच काल्पनिक आहे.असं म्हणतात की सत्याला मर्यादा असतात पण कल्पनेला कुठलेच बंधन नसल्याने ती अमर्याद धावू शकते.आणी निखळ मनोरंजन हाच हेतू असला तर मग थांबायचं कश्याला ?
ही कथा आहे १९४७ च्या थोड्या आधी घडलेली.सुदूर एका खोल दरीत महाराज सुदर्शन आणी देवी सुलक्षणा यांचे सुंदरपूर नावाचे राज्य होते.त्यांचे सुपुत्र सुजय उच्च शिक्षण घेण्याकरता लंडनला गेले होते.त्या वेळच्या प्रथेप्रमाणे युवराज सुजयचा विवाह लहानपणीच दिवापुरचे महाराज भरतसिंग यांची लाडकी मुलगी सुकन्याशी झाला होता.सुकन्या अत्यंत रूपवान होती पण ?जाऊ दे राजवाड्यात सुद्धा या विषयी कोणी फारसं बोलत नसे.सुजय आणी सुकन्या यांची कन्या राजकुमारी सुवर्णरेखा पण आपल्या आई प्रमाणेच अत्यंत रूपवती होती.अवघ्या आठ वर्षाची सुवर्णरेखा आक्रस्ताळेपणा करून सगळा राजवाडा हलवून सोडायची .लहान असल्यामुळे सगळेच सहन करायचे. भारताला स्वतंत्र करण्याकरता देशाच्या कानाकोपऱ्यात जोरदार हालचाली सुरु होत्या,अर्थात सुंदरपूर सारख्या अडनिड ठिकाणी या विषयी फारशी माहिती नसणं स्वाभाविकच होतं त्यांना वेगळ्याच गोष्टीची उत्सुकता होती ती म्हणजे राजे सुजय केव्हा परत येणार !राजे येणार असल्याची कुजबुज सगळ्या सुंदरपुरात एव्हाना पसरली होती आणी त्याला कारण होतं राजवाड्याच्या रंगकामात रघुनाथ नावाच्या एका परगावच्या चित्रकाराची घेतलेली मदत!
रघुनाथ विषयी कोणालाच काही माहित नव्हतं.महाराज सुदर्शन यांचे मित्राने त्याचे नाव सुचविले होते.
सौ.उषा.
Friday, 28 October 2011
USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच ना...
USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच ना...: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच नात्यांना एक वेगळाच गोडवा आहे,मान आहे,हळुवार जपणूक आहे.आपण कोरडे दिवस सेलिब्रेट करत नाही....
आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच नात्यांना एक वेगळाच गोडवा आहे,मान आहे,हळुवार जपणूक आहे.आपण कोरडे दिवस सेलिब्रेट करत नाही.आई वडील वृद्धाश्रमात आणी मुलं mothers day fathers day सेलिब्रेट करताहेत अस नाही.बहीण भावाच्या अनेक सुंदर कथा आमच्या चित्रपटातून आलेल्या आहेत.कृष्ण द्रौपदी ही जोडी तर आपल्या सगळ्यांची आवडती आहे.श्यामची आई या चित्रपटात एक सुंदर गीत होत "भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण "बहिणीने भावाच्या दीर्घायुष्या बद्दल देवाजवळ प्रार्थना करावी,त्याला गोड धोड खाऊ घालावे आणी भावाने संकट समयी तिचे रक्षण करावे असा मोठा गोड करार आहे.ज्या मुलीला भाऊ नाही तिची पण आमच्या पूर्वजांनी सोय केली आहे ,चंद्राला ओवाळले की झाली भाऊबीज साजरी !पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
सौ.उषा.
Thursday, 27 October 2011
USHA: श्री आज प...
USHA: श्री आज प...: श्री आज पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!आजच्या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हणतात.राक्षसांचा राज...
श्री
आज पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!आजच्या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हणतात.राक्षसांचा राजा बली हा मोठा भगवतभक्त होता त्याने केलेल्या यज्ञाच्या समाप्तीला साक्षात भगवान विष्णू छोट्या बटूच्या रुपात दक्षिणा मागायला आले,राजानी त्यांना नमस्कार करून काय हवी ती दक्षिणा मागायला सांगितली,वामन अवतारात आलेल्या विष्णूला ओळखायला दैत्यगुरू शुक्राचार्यांना अजिबात वेळ लागला नाही त्यांनी बलीराजाला सावध केले पण राजा शब्दाचा पक्का होता,त्याने माघार घ्यायला नकार दिला,साक्षात विष्णू भिक्षा मागायला आल्यावर ती न देण्याचा करंटेपणा करणं बळीराजासारख्या दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजाला शक्यच नव्हतं.तीन पाऊल जमीन दक्षिणा बटूने मागितली.वामनाने एका पावलाने पृथ्वी,दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला,तिसरे पाऊल कुठे ठेवू विचारल्यावर बळीराजाने विनम्रपणे नमस्कार करून आपले मस्तक पुढे केले,त्यावर पाऊल ठेऊन वामनाने त्याला थेट पाताळात ढकलले,त्याच्या दानशूर पणावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला वर मागायला सांगितला तर बळीराजा म्हणाला की माझ्या दारावर तुम्ही सतत उभे रहा.भगवान विष्णू आता वैकुंठ सोडून बळीराजाच्या दरवाजावर पहारेकरी म्हणून उभे झाले.वैकुंठात लक्ष्मीदेवी अत्यंत दुखी झाली पण ती लगेचच निघाली जिथे नारायण तिथे लक्ष्मी !दारी चालून आलेल्या लक्ष्मीचे बळीने मनोभावे स्वागत केले तिला बहिणीचा मान देऊ केला.हीच संधी साधून लक्ष्मीने आपले पती म्हणजे नारायण जे दारावर उभे होते त्यांच्या सुटकेची विनवणी केली,उदार बळीराजाने मोठ्या मनाने वामनाची सुटका केली.लक्ष्मी नारायण प्रसन्न झाले आणी त्यांनी बळीला आशीर्वाद दिला.जगाचे पालन पोषण करणाऱ्या लक्ष्मी नारायणाला निव्वळ भक्तीने आपल्या अंकित करून घेणाऱ्या बळीराजाचे स्मृती प्रीत्यर्थ आज बली प्रतिपदा! पाडवा!लक्ष्मी नारायण आपल्या सगळ्यांना प्रसन्न व्हावे हीच शुभेच्छा !लक्ष दिव्यांच्या ज्योतीने आपल्या आयुष्यात सुख सौभाग्याचा आरोग्याचा प्रकाश पसरावा ही शुभेच्छा व्यक्त करून मी आज इथेच थांबते.
सौ.उषा.
Wednesday, 26 October 2011
USHA: श्री पहाटेच्...
USHA: श्री पहाटेच्...: श्री पहाटेच्या या समयी म्हणा हरी हरी !भगवान गोपालकृष्णाच्या स्मरणाने आज दिवाळीतला एक महत्वाचा दिव...
श्री
पहाटेच्या या समयी म्हणा हरी हरी !भगवान गोपालकृष्णाच्या स्मरणाने आज दिवाळीतला एक महत्वाचा दिवस उगवला.नरकासुराच्या बंदिवासातून सोळा हजार राजकन्यांची कृष्णाने मुक्तता केली आणी त्यांच्याशी विवाह करून त्यांना समाजात एक प्रतिष्ठित स्थान मिळवून दिले तो हा नर्क चतुर्दशीचा दिवस ! आजच संध्याकाळी अमावस्या लागणार असल्याने लक्ष्मी पूजन पण आहे. अगदी लहान वयापासून आपण मनापासून पूजा करतो ती ही लक्ष्मीदेवी! पावलागणिक जिच्यावाचून आमचं अडतं ती ही लक्ष्मी !हिची स्तुती करताना एका स्तोत्रात म्हटलं आहे लाक्ष्मिमुळेच तुमच्या रूप,गुण ,कुल नव्हे एकूण तुमच्या अस्तित्वालाच हिच्यामुळे शोभा येते !तर अशी ही लक्ष्मी सन्मार्गाने धन कमविणाऱ्याकडे नारायणासहित गरुडावर बसून येते आणी सर्व प्रकारच्या सुख समृद्धीचा वर्षाव करते.अधर्माने धन कमविणाऱ्याकडे हीच लक्ष्मी घुबडावर बसून येते आणी त्या घरात मग शांतीचा,सुखाचा मागमूस उरत नाही.लक्ष्मीची खूप छान छान स्तोत्र आहेत पण सर्वाधिक प्रचलित श्रीसूक्ताने देवीला अभिषेक करण्याचाही प्रघात आहे.पूज्य डोंगरे महाराज म्हणायचे की लक्ष्मी माता है उसका उपयोग तो किया जा सकता है उपभोग नही!केवळ लक्ष्मीचे आणी गणेशाचे पूजन करण्यापेक्षा आधी गणेश पूजन करून मग नारायणासहित लक्ष्मीचे पूजन हे जास्त शास्त्र शुद्ध आहे.शंकराचार्य एकदा एका घरी भिक्षा मागायला गेले ,घरातल्या गृहिणीने मोठ्या दुक्खी अंतःकरणाने घरात असलेला एक आवळा त्यांना भिक्षा म्हणून दिला घरात बाकी काहीच नसल्याचे तिचे दुक्ख शिव अवतार शंकराचार्यानी ओळखले, तिचे उदार मन बघून त्यांनी तिथल्या तिथे एका अद्भुत स्तोत्राची रचना करून देवी लक्ष्मीची आळवणी केली आणी त्या घरात सुवर्णाची बरसात झाली.ते कनकधारा स्तोत्र म्हणून आपणपण देवीला म्हणूया "नमोस्तु हेमामबुजपिठीकाये नमोस्तु भूमंडलनायीकाये,नमोस्तु देवादिदयापराये,नमोस्तु शार्न्गयुध वल्लभाये" सर्वांना आरोग्य सुख समृद्धी श्री लक्ष्मी नारायणाचे कृपेने लाभो ही त्यांचे चरणी विनम्र प्रार्थना!
सौ.उषा.
Tuesday, 25 October 2011
आली दिवाळी
श्री
दिवाळीचा उत्साह आता हळू हळू वाढत जाणार.मराठी माणसांच्या दिवाळीचे एक अविभाज्य अंग म्हणजे दिवाळी अंक ,लक्ष्मीपूजन करताना सरस्वतीचे स्मरण आवर्जून ठेवणे ह्यालाच म्हणतात संस्कृती !फराळ फटाके,नवीन कपडे ,दागिने सगळ्यांची नवलाई वापरल्यावर कमी कमी होत जाते,एका माणसाने वापरले की कपडे दागिने दुसऱ्याला वापरायची इच्छा होत नाही, पण पुस्तकांचे असे नसते एकानंतर दुसरा असे आपण सगळेच त्यांचा आनंद घेऊ शकतो.एकाने वाचायचे आणी बाकीच्यांनी ऐकायचे या पद्धतीनेतर कित्येक लोक एकाच वेळेस पुस्तकाचा आनंद घेऊ शकतात.सकस अन्नाने जसे शरीराचे पोषण उत्तम प्रकारे होते तसेच सकस साहित्याने आपल्या मन, बुद्धीचे उत्कृष्ट पोषण होते.असा सरस्वतीपुत्र जीवनात हरघडी येणाऱ्या नानाविध समस्यांना यशस्वीपणे सामोरे जातो.आपल्या घरातील मुलांना लहानपणापासूनच अश्या प्रकारे सरस्वतीपूजनाची सवय लावा लक्ष्मी आपोआपच येईल.सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !
सौ.उषा.
Monday, 24 October 2011
श्री
खूप वर्षापूर्वी दिवाळीच्या थोड्या आधी मी आमच्या नवीन शेजाऱ्यांना सांगितलं की तुमचं घराचं काम दिवाळीत कृपा करून बंद ठेवा तर त्यांनी ताबडतोब मान हलवून रुकार दिला मला हायसं वाटलं कारण गेले कित्येक दिवस त्यांच्या घराच्या बांधकामामुळे आमच्या अंगणात केव्हा काय येऊन पडेल याचा काही नेम नव्हता.नर्क चतुर्दशीच्या दिवशी सकाळी मी आणी माझ्या मुलीनी म्हणजे कल्याणीनी अंगणात सव्वीस थेम्बी सव्वीस ओळी अशी भली मोठी रांगोळी काढली रंग भरले तृप्त नजरेनी आपली रांगोळी न्याहाळली आणी दुसऱ्या कामाला वळलो.साधारण दहाच्या सुमारास बेल वाजली म्हणून दार उघडायला गेले आणी समोरचे दृश बघून रागवू नाही म्हटल तरी खूप राग आला आमच्या रांगोळीवर सिमेंट रेती विटांचे तुकडे ह्यांचा खच पडला होता.एक वेगळीच रांगोळी ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आमच्या पुढे साकारली होती.थोड्याच वेळात आमचे ते शेजारी आले अन मी त्यांना रांगोळी दाखवून रागानेच विचारले आपको बताया था फिरभी आपने हमारी रांगोली मिटाने मे कोई कसर नहि छोडी त्यावर ते निरागसपणे म्हणाले आपने तो दिवाली के दिन के बारे मे बोला था और मुझे याद भी है ,हम भी तो हिंदू हैं लक्ष्मी पूजा कल है भाभी !झालं एव्हढ म्हणून ते निघून गेले,मी कपाळावर हात मारून घेतला अन मग विचार करू लागले तो लक्षात आले की साग्र संगीत दिवाळी फक्त आम्ही मराठी माणसच साजरी करतो,बाकी सगळ्यांना दिवाळी म्हणजे लक्ष्मी पूजनच अभिप्रेत असतं ! असो ,आज भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अवतरले तो सुदिन .जगातील पहिला डॉक्टर हातात शंख चक्र अमृतकलश आणी जालोका घेऊन अवतरला कुठल्याही काळात सहज उपलब्ध हानिरहित औषधाचा अमृत साठा घेऊन धन्वंतरी आले आणी त्यांचे एकापेक्षा एक वरचढ शिष्य ह्यांनी सगळ्या जगाला निरोगी जीवनाच्या सोप्या युक्त्या सांगितल्या म्हणून आपण आजच्या दिवशी त्यांचे विशेष स्मरण करतो.काही लोक आज पण लक्ष्मी पूजा करतात .घरात समृद्धी रहावी म्हणून एखादी वस्तू आजच्या दिवशी विकत घेण्याचा पण प्रघात आहे.पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
सौ.उषा.
Sunday, 23 October 2011
USHA: श्री सर्वप्रथम सगळ...
USHA: श्री सर्वप्रथम सगळ...: श्री सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !उद्यापासून चार पाच दिवस तुम्ही कदाचित इतके busy व...
श्री
दिवाळीच्या शुभेच्छा मी रोजच दिवाळी संपेपर्यंत देणार कारण प्रत्येक व्यक्ती वेग वेगळ्या वेळेस माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करेल ह्याची मला जाणीव आहे.सगळ्यांच्या आरोग्याची,बुद्धीची,धनाची,कल्याणाची आणी रक्षणाची प्रार्थना केल्यावर मन कसं प्रसन्न होऊन जातं.आपण जे दुसऱ्याला देतो ते सव्याज आपल्याला परत मिळतं हा निसर्ग नियमच आहे. आपलं लहानसं जीवन आनंदाने भरून जावे असे वाटत असेल तर सर्वांच्या उत्कर्षाची अभिलाषा धरा.फक्त स्वतः पुरतं मागण्याचा हव्यास देवाला पण रुचत नाही.अश्या प्रार्थनांचा तो अजिबात स्वीकार करत नाही.निसर्ग आम्हाला सदैव उत्तुंग स्वप्न पाहायला शिकवतो .समुद्र,डोंगररांगा,हिरवळ,नद्या कोणीच कोतेपणा शिकवत नाही.आपल्याजवळ असलेलं भरभरून वाटणं हा ह्यांचा सहज स्वभाव हातचं राखून कोणीच देत नाही,मग ह्या निसर्गाचा एक भाग असलेला माणूस तेवढा कोता का वागतो ? पण दिवाळी सारखा सण आला की सगळ्यांनाच उत्साह येतो.सगळे एकमेकांना खूप शुभेच्छा देतात त्यामुळे सगळ्या वातावरणात आनंदलहरी पसरतात आणी म्हणूनच आपणा सगळ्यांना हा सण मनापासून आवडतो .
सौ.उषा.
Saturday, 22 October 2011
USHA: श्री सर्वप्रथम सगळ...
USHA: श्री सर्वप्रथम सगळ...: श्री सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !उद्यापासून चार पाच दिवस तुम्ही कदाचित इतके busy व...
श्री
सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !उद्यापासून चार पाच दिवस तुम्ही कदाचित इतके busy व्हाल की माझ्या शुभेच्छा तुम्हाला दिवाळी नंतर मिळतील आणी मला तेच नको आहे.उद्या संध्याकाळी आपण अंगणात पहिली पणती लावणार ,छान रांगोळी काढणार,मस्त फराळाचे पदार्थ तयार करणार,नवे कपडे घालणार मुख्य म्हणजे उद्या गाय वासराची पूजा करून दिवाळीच्या सणाची सुरुवात करणार.दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आम्ही हिंदू निसर्गपूजक प्रकाश पूजक आहोत.माझ्या देशाचे नाव ह्याचे ध्योतक आहे .भारत, भा म्हणजे प्रकाश आणी रत म्हणजे रमणारा प्रकाशात रमणारा तो भारत !ज्ञान विज्ञानाच्या प्रकाशाने जो सतत नूतन भासतो तो भारत !ह्या देशावर निसर्ग बेहद्द खूष आहे.इथे पावसाळ्याचे काही ढगाळ दिवस सोडले तर बाराही महिने लक्ख सूर्यप्रकाश असतो त्यामुळे असेल कदाचित प्रकाशाचं इथल्या प्रत्येकाला नैसर्गिक आकर्षण आहे. उद्या वसुबारस आणी परवा धनत्रयोदशी ज्या दिवशी आपण दक्षिणेकडे तोंड करून पणती लावतो,भगवान धन्वंतरीची पूजा याच दिवशी करायची असते.गाय वासरू ,मग वनस्पती आहे न निसर्गाची पूजा .
सौ.उषा.
Thursday, 20 October 2011
श्री
दीदींच्या प्रश्नाला मी जे उत्तर दिले की आम्ही रिक्षाने आलो त्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवली म्हणाल्या " उषा तुम्हे शायद taxi कहना है" त्यावर मी त्यांचा हात धरून त्यांना खिडकी जवळ नेले व झाडाखाली उभा असलेला रिक्षा दाखवला त्या एवढच म्हणाल्या तुम सचमुच बहोत थक गई हो आओ खा पीकर सो जावो कल सबेरे बात करेंगे.मी आता मात्र खूप जोरात मान हलवून त्यांना सांगितलं की मी निव्वळ नाईलाज म्हणून आले आहे,कृपा करून माझं नागपूरच परतीच ticket द्या अन मी ताबडतोब इथून जाते.त्यानी दिलेलं सरबत फक्त आम्ही घेतलं काहीही खाण्याची इच्छाच उरली नव्हती.आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.दिदींनी खिडकीतून हात हलवून आम्हाला निरोप दिला त्याची मला गंमतच वाटत होती.पुन्हा तीच उसाची शेतं,तोच घुंगरांचा आवाज,तेच सुंदर तरीही भीतीदायक चांदणं,आणी तीच विचित्र शांतता !रिक्षा वाला बहुदा मुका असावा कारण तो एकही शब्द बोलत नव्हता आमच्या कुठल्याच प्रश्नाचं त्याने काहीही उत्तर दिले नव्हते,अर्थात आम्हाला त्याच्या मूक बधीर असण्यापेक्षा इथून सही सलामत घरी जाण्याच्या काळजीने जास्त घेरले होते.आम्ही त्या चहापानाच्या टपरी जवळ आलो हे आम्हाला खरच वाटत नव्हतं.म्हंटल ह्या रिक्षावाल्याला ठरल्या पेक्षा जरा जास्त पैसे देऊ रिक्षातून उतरल्यावर बाळाला बाबांजवळ दिलं,आतापर्यंत छातीशी दडवून ठेवलेल्या पैशाच्या पाकिटातून पैसे काढले आणी त्याला द्यायला गेले तर अरेच्या हा एका मिनिटात गेला तरी कुठे ,सगळीकडे शोधक नजर टाकली कुणीच नव्हतं ,अंगावर एक शहारा आला घाबरतच टपरीवर विचारलं की "भैया वो रिक्षावाला कहा गया हमे उसके पैसे देने है अजीब है पैसे की भी फिकर नही."त्यावर टपरीवाला म्हणाला दीदी मै कई सालो से ये टपरी चला रहा हू और मै आपको विश्वास दिलाता हू की इस रास्तेपर आजतक किसीने कोई रिक्षा नही देखा.इतनी रात को यहासे कोई जाता भी नही ये वोही रास्ता है जिसके बारेमे आयेदिन अखबार में स्त्रीयोसे छेडछाड और खून की खबरे छ्पती रहती है .मी नकळत माझ्या पतीचा हात घट्ट धरला एक थंड शहारा पुन्हा शरीरभर पसरला .एवढ्यात काशीकडे जाणारी शेवटची बस आली आम्ही घाई घाईने आत चढलो चालक अन वाहक ह्यांच्या शिवाय बस मध्ये कुणीच नव्हतं.टपरीवाल्याचा आवाज खूप दुरून कानात घुमत होता "आपलोग बहोत भाग्यवान हो जो काशी विश्वनाथ ने आपको दर्शन दिये और इस भयंकर सडक पर आपकी रक्षा की!"
सौ.उषा.
Wednesday, 19 October 2011
श्री
शेवटी एकदाचे आम्ही त्या दिदिंकडे येऊन पोचलो.रिक्षावाल्याला मोठ्या अजीजीने थांबण्याबद्दल विनविले कारण वाटेत कुठेही मनुष्य वस्तीच्या खुणा दिसल्या नव्हत्या .आम्ही कुठल्यातरी अनोळखी ग्रहावर आलो आहे की काय असे वाटण्या इतपत भेसूर शांतता सगळीकडे पसरली होती.रिक्षावाला पुन्हा मानेनेच हो म्हणाला,आम्ही दीदींच्या घराची घंटा वाजविली.एक कुजबुज केल्या सारख्या आवाजात विचारणा झाली कौन है ? मी उषा उत्तर दिल्यावर थोड्यावेळ शांतता मग दीदींचा आवाज आला कौन है ? दीदी मैं उषा हुं.थोडा अविश्वास आणी पुष्कळ भीती असा त्यांचा चेहेरा किलकिल्या दारातून डोकावला,मला दारात बघून आश्चर्य आनंद यांनी त्यांचा चेहरा उजळून निघाला.आम्हाला आत घेऊन त्यांनी दार बंद करून घेतले.मला म्हणाल्या तुम सचमुच आवोगी ये मैने सोचा नाही था,पर उषा तुम याहांतक आई कैसे ?
सौ.उषा.
Tuesday, 18 October 2011
श्री
काशी दर्शन आटपून आम्ही परत आलो तेव्हा संध्याकाळचा अंधार दाटून आला होता पण त्या दिदिंकडे जाण्याशिवाय पर्याय पण नव्हता,मामाला कळवू म्हटले तर त्याचा फोन नंबर असूनही जागोजागी फोन करता येतील अशी काहीही व्यवस्था नव्हती.दिवसभराच्या बस प्रवासाने आम्ही तिघही खरतर कंटाळून गेलो होतो पण ticketच्या पैशावर सहज पाणी सोडावे अशीही आमची परिस्थिती नव्हती.पुन्हा बस मध्ये बसलो अंदाजे दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही उतरलो ती जागा अजिबात आकर्षक नव्हती.रातकिड्यांचे आवाज, मिणमिणत्या उजेडात एक छोटीशी चहापानाची टपरी.इकडे तिकडे नजर टाकल्यावर दूरवर एक सायकलरिक्षा उभा दिसला.आमच्या जवळचा पत्ता त्याला सांगितल्यावर त्याने मानेनेच रिक्षात बसायची खूण केली.फक्त रिक्षाच जाऊ शकेल एव्हढी जागा अन दुतर्फा उंच वाढलेली उसाची शेतं ,वर आकशात पौर्णिमेचा चंद्र लाखो चांदण्यांना घेऊन अमृत प्रकाशाची मुक्त उधळण करत होता हाच काय तो जिवंतपणाचा अन आमचा संबध बाकी सगळाच प्रकार हिंदी भयपटात असतो तसा प्रकार.रिक्षाला लावलेया घुंगरांचा आवाज त्या निर्मनुष्य जागेत अजिबात आनंद देत नव्हता. रात्रीचा गारठा वाढत चाललेला ,हळूहळू आम्हाला त्या चांदण्याची सुद्धा भीती वाटू लागली.आम्ही केव्हा मनातल्या मनात रामरक्षा म्हणू लागलो ते आम्हालाही कळले नाही.आम्हाला खूप बोलायचे असून एकही शब्द बोलता येत नव्हता इतकी विचित्र शांतता सगळ्या परिसरात होती.
सौ.उषा.
Monday, 17 October 2011
श्री
आम्हा सर्व हिंदूंना जी यात्रा आयुष्यात एकदातरी घडावी अशी काशीयात्रा मला चक्क तीनदा घडली ही माझ्यावर देवाची विशेष कृपा असं मी तरी मानते. काशीला माझा मामा रेल्वेत deputation वर गेला होता त्यामुळे राहण्याची व्यवस्था उत्तम होती.माझे पति आणी दोन महिन्यांची माझी मुलगी असे आम्हीं काशीला गेलो होतो.गेल्या गेल्या मामानी मला बजावलं तू कुठेही जा पण सातच्या आत घरात दिसली पाहिजे.इथे सध्या तरुण मुलींचे दागिने हिसकावून त्यांना भ्रष्ट करून त्यांच्या बरोबरच्या पुरुषाला ठार मारून टाकले अश्या बऱ्याच घटना एवढ्यात घडल्या आहेत .मी काशीला telephone exchange ला माझ्या एका वरिष्ठांना भेटायला गेले,त्यांनी त्यांच्या घरी येण्याचा खूप आग्रह केला मी नाही म्हणते आहे बघितल्यावर त्यांनी माझे परतीचे ticketच काढून घेतले आणी ते त्यांच्या घरी गेल्यावर मिळेल असेही सांगितले.बर आता उद्या भेटूया तुम्हालाही तुमची कामं असतील न !
सौ.उषा.
Sunday, 16 October 2011
श्री
नरेंद्र दत्त म्हणजे आपले स्वामी विवेकानंद त्यांच्या लहानपणी पूर्ण नास्तिक होते.त्यांची आई शिव भक्त आणी खूप अन्नदान करणारी होती त्यामुळे त्यांच्या दारावर कायमच साधू संन्यासी यायचे, त्या प्रत्येकाला लहानगा नरेन विचारायचा तुम्ही देव पहिला आहे? त्यावर त्यांचे नकारार्थी उत्तर ऐकून नरेनला खूप राग यायचा तो म्हणायचा की जो देव तुम्ही पहिला नाही त्याच्या विषयी बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. खूप वर्षांनी तरुण नरेनला असा एक अधिकारी पुरुष भेटला ज्याच्या उत्तराने नरेंद्रच्या आयुष्यातली सगळी समीकरणेच बदलून गेली.रामकृष्ण परमहंस त्याला म्हणाले की मी देव बघितला आहे,तो माझ्याशी रोज बोलतो एवढेच नाही तर मी तुला सुद्धा देव दाखवू शकतो.असे परिपूर्ण उत्तर ऐकल्यावर नरेंद्र अगदी हरखून गेला,पुढे त्याने खूप मोठे कार्य केले जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.पण हा देव मी पहिला असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा माझ्यावर निश्चितच विश्वास बसणार नाही.असो मी उद्या तुम्हाला ती हकीकत सांगीन. आज एवढच पुरे . सौ.उषा.
Thursday, 6 October 2011
USHA: श्...
USHA: श्...: श्री नवरात्र संपलं आज विजयादशमी !पराक्रमाची पूजा करायची हे आम्हाला लहापणापासून शिकविले जाते...
श्री
नवरात्र संपलं आज विजयादशमी !पराक्रमाची पूजा करायची हे आम्हाला लहापणापासून शिकविले जाते.राम कृष्ण शिवाजी राणा प्रताप झाशीची राणी अहो किती नावे घेणार ह्या सगळ्यांच्याच गोष्टी आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आणी म्हणूनच काहीही नातं नसताना आम्ही सचिनच्या शतकाने आनंदित होतो,त्याला भारतरत्न मिळावं म्हणून अभियान चालवतो,अमिताभ अजूनही तरुणांना मागे टाकून आघाडीवर असल्याचे आम्हाला कौतुक वाटते.पराक्रम करण्याकरता प्रत्येक वेळेस युद्धभूमीच हवी असं काहीही नाही.ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्याच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करायला भरपूर वाव आहे हे लक्षात ठेवले की आपल्या कामगिरीची सीमारेषा संकुचित राहणार नाही.विजयलक्ष्मी हेही देवीच एक रूप आहे तिच्या चरणी माझे हे पुष्प.
Wednesday, 5 October 2011
श्री
आज नवमीची पूजा आपण केली.सर्व असुरांचा संहार करण्याकरता ज्या कमळात राहणाऱ्या महालक्ष्मीने दुर्गावतार धारण केला.त्या महालक्ष्मीची आज पूजा !स्त्री ही फक्त अलंकार लेऊन मिरवणारी नसते तर प्रसंगी ती रौद्र अवतार पण घेऊ शकते हेच या कथेतून कळते..मुळात स्त्रीला देवाने कोमलांगी,मृदू स्वभावाची ,हळवी अशीच घडविली आहे.मुलांना सांभाळताना ह्या गुणांचा फार उपयोग होतो,घर सावरायला पण या गुणांची गरज आहे.पण हेच गुण तिचे weak point समजून जर कुणी गैर वागायला लागला तर त्याला धडा शिकवायला ती कमी करत नाही.तिला महालक्ष्मीच राहू देणे समाजाच्या हिताचे आहे.तिची मनोभावे प्रार्थना करू या "सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते".महालक्ष्मीच्या चरणी माझे हे पुष्प!
सौ.उषा.
Tuesday, 4 October 2011
श्री
आपल्याला आपल्या आयुष्यात रोज फक्त आणि फक्त सुख आनंद यश कीर्ती हेच हवं असतं.अपरिहार्यपणे येणाऱ्या दुक्खाची अपयशाची चिंतेची भीतीची आपण काहीच मानसिक तयारी केलेली नसते.आपल्या भोवतालची अनेक माणसं मरताना आपण बघतो पण आपण आपल्या मृत्यूबद्दल विचार करायचं सुद्धा टाळतो.ह्याचाच आज आपण विचार करू या.देवांवर संकट आलं अमृत पिऊनहि अमर न झालेल्या देवांची दया येऊन जगदंबेनी असुरांना मारण्याकरता अत्यंत उग्र रूप धारण केलं काळा रंग अंगावर व्याघ्रचर्म संतापाने लाल झालेले डोळे आणी राक्षसांच रक्त पिण्याकरता आसुसलेली लाल जीभ!एखादा भित्रा जीव तर नुस्त वर्णन ऐकूनच बेशुद्ध व्हायचा.पण ज्याला जी भाषा कळते त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं हा संदेश ही महाकाली देते आहे.उगीचच अहिंसा सत्य अशी पोपटपंची नको.ही शूरांची शस्त्र आहेत आणी त्यांनाच ती शोभून दिसतात .येणाऱ्या संकटांना भिऊन पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना करा असं ही देवी आम्हाला सांगते आहे.त्या असुरांना भीती उत्पन्न करणाऱ्या महाकालीच्या चरणी माझे हे पुष्प.
सौ.उषा.
आपल्याला आपल्या आयुष्यात रोज फक्त आणि फक्त सुख आनंद यश कीर्ती हेच हवं असतं.अपरिहार्यपणे येणाऱ्या दुक्खाची अपयशाची चिंतेची भीतीची आपण काहीच मानसिक तयारी केलेली नसते.आपल्या भोवतालची अनेक माणसं मरताना आपण बघतो पण आपण आपल्या मृत्यूबद्दल विचार करायचं सुद्धा टाळतो.ह्याचाच आज आपण विचार करू या.देवांवर संकट आलं अमृत पिऊनहि अमर न झालेल्या देवांची दया येऊन जगदंबेनी असुरांना मारण्याकरता अत्यंत उग्र रूप धारण केलं काळा रंग अंगावर व्याघ्रचर्म संतापाने लाल झालेले डोळे आणी राक्षसांच रक्त पिण्याकरता आसुसलेली लाल जीभ!एखादा भित्रा जीव तर नुस्त वर्णन ऐकूनच बेशुद्ध व्हायचा.पण ज्याला जी भाषा कळते त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं हा संदेश ही महाकाली देते आहे.उगीचच अहिंसा सत्य अशी पोपटपंची नको.ही शूरांची शस्त्र आहेत आणी त्यांनाच ती शोभून दिसतात .येणाऱ्या संकटांना भिऊन पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना करा असं ही देवी आम्हाला सांगते आहे.त्या असुरांना भीती उत्पन्न करणाऱ्या महाकालीच्या चरणी माझे हे पुष्प.
सौ.उषा.
Monday, 3 October 2011
श्री
आज श्री महासरस्वतीची पूजा !साहित्य संगीत नृत्य चित्रकला किती नावं घेणार थोडक्यात म्हणजे सर्वच क्षेत्रातल्या माणसांनी या देवीची उपासना केली पाहिजे.सर्व विद्धयांची अधिष्ठात्री ही देवी सरस्वती भक्तांना सहज प्रसन्न होते.वीणावादिनी वर दे म्हणून भक्तांनी फक्त हाक मारायचा अवकाश ही देवी साक्षात दर्शन देते.भगवतीच हे सगळ्यात सौम्य आणी विलोभनीय रूप आहे.शुभ्र वस्त्रा शुभ्र फुलांनी प्रसन्न होणारी ही शारदा प्रगट होते ती निरनिराळ्या कलांच्या आनंददायी अविष्कारानी.सर्व कलाकार जिच्या कृपेची अभिलाषा धरतात अश्या या शारदेला आपण पण विनवुया "नव गति नव लय ताल छंद नव नवल कंठ नव जलद मंद्र रव नव नभ के नव विहग वृंद को नव पर नव स्वर दे वीणावादिनी वर दे" ! देवी सरस्वतीच्या चरणी माझे हे पुष्प अर्पण.
Sunday, 2 October 2011
श्री
या देवी सर्व भूतेषु क्षुधा,रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः सर्व जीव मात्रांच्या ठिकाणी भूक तहान निद्रा या भावनांची तीव्रता एकसारखीच असते.त्यांच्या या गरजा सारख्याच असतात हे लक्षात घेऊन आपण आपल्या आवाक्यात असणारी मदत जर देऊ केली तर ती जगन्माता आपल्यावर निश्चितच प्रसन्न होईल यात संशय नाही.पण मनुष्य जन्म घेतल्यावर आपण याही पलीकडे जाऊन विचार करावा असं शंकराचार्यांना वाटतं.ते त्यांच्या अन्नपूर्णा स्तोत्रात जगदंबेला काय मागतात ते बघण्या सारखे आहे.ते म्हणतात
"अन्नपूर्णे सदा पुर्णे शंकरप्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्द्यर्थम भिक्षां देहि च पार्वती".ज्ञान वैराग्य हे मनुष्य जन्माचे अंतिम उद्दिष्ट आहे पण आमचा सर्व वेळ निरर्थक गोष्टींमध्ये जातो.फारच कमी लोक ह्या अंतिम ध्येया पर्यंत जाऊन पोचतात.शेवटच्या घटके पावेतो आम्हाला या सगळ्यात गुंतून पडायला फार आवडते.जबजागो तब सबेरा अशी हिंदीत म्हण आहे.आपण पण अन्नपूर्णेला म्हणूया ज्ञान वैराग्य सिद्द्यर्थम भिक्षां देहि च पार्वती.
सौ.उषा.
Saturday, 1 October 2011
श्री
आज ललिता पंचमीची पूजा बऱ्याच लोकांकडे असते.देवीला दुधाचा,पंचामृताचा ,कुंकवाचा अभिषेक असे बहुदा पूजेचे स्वरूप असते.श्रीसूक्त नवरात्रात आजकाल बहुतेक सगळेच म्हणतात.आपली स्तोत्र जर आपण लक्षपूर्वक म्हंटली तर आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी,समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न हे सगळेच आपल्याला त्यात गुंफलेले आढळते.जाज्वल्य देशप्रेम सुद्धा आमची स्तोत्र आमच्याही नकळत आम्हाला शिकवितात.श्रीसूक्तात स्वतःकरता धनदौलत मागताना प्रार्थना असते "प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मीन कीर्ती मृद्धीददातुमे". ज्या राष्ट्रात मी उत्पन्न झालो त्या राष्ट्रात मला यश ,ऐश्वर्यं,समृद्धी तू प्रदान कर .किती सुंदर अर्थ आणी किती सुंदर मागणी.माझ्यावर यश ऐश्वर्य मिळविण्याकरता माझी मातृभूमी सोडायची वेळ येऊ नये.त्याच बरोबर मला मिळणाऱ्या यशावर समृद्धीवर माझ्याच देशबांधवांचा अधिकार असावा ही गर्भित मागणी .आजच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्व ह्या श्रीसूक्ताचे पठण करून यशस्वी आणी समृद्ध होऊ या.श्री ललिता देवीच्या चरणी माझे हे पुष्प.
सौ.उषा.
Friday, 30 September 2011
श्री
नवरात्रात पुष्कळ लोक सप्तशती वाचतात.त्यात सुरवातीलाच कवच,अर्गला, कीलक, पाठ म्हणावा लागतो.कवच तर नावाप्रमाणे देवीचे कवच आहे.ज्याच्या नित्य पठणाने सर्व संकटातून आपली मुक्ती होईल असे आश्वासन त्यात आहे.त्यानंतर अर्गला म्हणजे कडी ,सप्तशतीच्या पठणाने अंगात दैवी सामर्थ्य संचारते,ह्या दैवी शक्तीचा कलियुगातल्या माणसांनी दुरुपयोग करू नये म्हणून ह्या श्लोकांना अर्गला म्हणजे कडी आणी कीलक म्हणजे कुलूप लावून बंदिस्त केले आहे.देवीच्या भक्तांना ह्याचा काहीच त्रास होत नाही.देवीची कृपा एवढीच त्यांची अपेक्षा असते,पण काही लोक एवढ्याने संतुष्ट होणारे नसतात त्यांना सिद्धी आणी प्रसिद्धी पण हव्या असतात .ह्यातले काही विशिष्ट श्लोक म्हणून हे कडी कुलूप उघडले जाते .अर्थात देवीच्या भक्तांना सप्तशती पाठाचे पूर्ण फळ मिळते.मग कशाला उगीच कडी कुलूप उघडून बघायचे?आपण नुसतीच प्रार्थना करू " रूपं देही जयं देही यशो देही द्विषो जहि " जगदंबेच्या चरणी हे पुष्प ! सौ.उषा.
Thursday, 29 September 2011
श्री
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते .सर्व देवतांच तेज एकवटल आणी त्या तेजाने सर्व विश्व व्यापून टाकलं.देवीच्या अनुपम सौंदर्यावर मोहित होऊन तिच्याशी विवाह करण्याच्या इराद्याने आलेले दोन मदमत्त राक्षस आपसात लढून मेले. चंड मुंड शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासुर अश्या सर्वच राक्षसांचा देवीने पूर्ण नायनाट केला.सगळ आसमंत देवीच्या जयजयकाराने भरून गेले.सर्वाना भयमुक्त करणारी देवी दुर्गा !पृथ्वीला निरनिराळ्या पोषक हरित तृणानी,शाक भाज्यांनी भरून टाकणारी शाकंभरी !सर्वाना सदैव हवीहवीशी वाटणारी ,हिरण्य वर्णा, हिरण्मयी, महालक्ष्मी तिच्या पूजनाशिवाय आमचे नवरात्र अपूर्णच म्हणावे लागेल.त्या जगन्मातेच्या चरणी हे दुसरे पुष्प. . . सौ.उषा.
Wednesday, 28 September 2011
श्री
दुर्गा काली जया रमा हरिप्रिया अंबे जगन्मंगले गौरी श्री भुवनेश्वरी तुज प्रती लक्षावधी वंदने .आज पासून देवीच नवरात्र सुरू झालं.सगळ्या वातावरणात एक प्रकारच चैतन्य भरलंय.घरोघरी घटस्थापना ,अखंड दिवा, माळ, नैवेद्य ,उपवास ,सप्तशती पारायण ,नवचंडी यज्ञ ,असं काय अन किती करू असं झालय.मला स्वतःला देवीच अष्टभुजा स्वरूप फार आवडतं.बलशाली महिषासुरावर चालून जाणारी ,आठही हातात शस्त्र धारण करणारी, सिव्ह्वाहीनी देवी सर्व स्त्री जातीला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देते.ती अबला नाही.ती शक्ती आहे अन तरीही ती रमा हरिप्रिया आहे.सर्वांच मंगल करणारी आहे.जगत्जननी आहे.वरदायिनी आहे,भक्तांना संजीवनी स्वरूप आहे म्हणूनच प्रियदर्शिनी आहे.त्या जगदंबेच्या चरणी नवरात्रातल पहिलं पुष्प.
सौ.उषा.
Tuesday, 27 September 2011
श्री
आम्हां भारतीय माणसांना मोक्ष मुक्ती ह्या शब्दांचे किती आकर्षण आहे हे फक्त भारतीय माणूसच समजू शकेल.हा मोक्ष किंवा ही मुक्ती मिळावी म्हणून आम्ही आजन्म काही न काही प्रयत्न करत असतो.देवभोळी माणसं वेगवेगळ्या देवांची व्रतं करतात आणी स्वतास नास्तिक म्हणवून घेणारे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना हर तऱ्हेची मदत करण्याचा पर्याय निवडतात.ह्या मोक्ष शब्दाने आम्हाला इतकी भुरळ घातली आहे की आम्ही आपल्या दिवंगत आप्तेष्टाना मृत्यू नंतर उत्तम गती मिळावी म्हणून त्यांच्या तिथीला नेमाने श्राद्ध करतो.ज्यांना तिथी माहीत नाही ,लक्षात नाही त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे पितृमोक्ष अमावास्येच्या दिवशी श्राद्ध करावे.ह्या निमित्ताने आपल्या पूर्वजांचे त्यांच्या उत्तम कार्याचे स्मरण होत असेल तर हे खूपच छान आहे.पण जिवंत आप्तेष्टांशी चांगले वागावे किबहुना सगळ्यांशी चांगले वागावे हे कसे आपल्या हातात आहे.आपले सत्कर्मच आपल्याला मोक्ष मिळवून देईल असे मला वाटते.
सौ.उषा
Monday, 26 September 2011
सुधारणा करायची म्हंटल म्हणजे आपल्याला दुसऱ्या माणसांनी काय काय सुधारणा करायला हव्या ते पटकन आठवतं.आपण सुचवलेल्या सुधारणा त्यांना कितपत मान्य आहेत ह्याच्याशी आपल्याला काहीही देणघेण नसतं.पण खर सांगू दुसऱ्याला सुधारण्याच्या फंदात आपण न पडलेलं बर.स्वताला सुधारणे , स्वतः मध्ये अनुकूल बदल घडवून आणणे हे कितीतरी पटींनी सोपे आणी जास्त फायदेशीर आहे.आपल्यातले चांगले बदल आपल्या व्यक्तीमत्वाला एक वेगळीच उंची प्राप्त करून देतात .हे बदल कायमस्वरूपी आनंददायक ,इतरांना प्रेरणा देणारे ठरतात पण आपण आपला बहुमोल वेळ इतरांना सुधारण्याच्या फोल प्रयत्नात घालवतो.देवानी दिलेलं आयुष्य सत्कारणी लावणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.ह्या आयुष्याचा जास्तीत जास्त भाग सगळ्यांच्या उपयोगी कसा पडेल हे ठरवणे आपल्याच हातात आहे.परमेश्वरानी आपल्या सगळ्यांनाच ही बुद्धी दिलेली आहे. . . . . . . .. . . . सौ.उषा .
Sunday, 25 September 2011
श्री जिवलगा कधी रे येशील तू ? एक सुंदर गाणं.हा जिवलग आपला प्रत्येक वयात वेगळा असतो.अगदी तान्हेपणी आपली आई आपल्याला जिवलग असते.तुम्ही म्हणाल आम्हाला आमची आई अजूनही आवडते.बरोबर आहे अहो मला सुद्धा माझी आई खूप आवडते.माझा मुद्दा समजून घ्या.तरुण वयात आपल्या जोडीदाराशिवाय जगात काहीही चांगले असूच शकत नाही असा आपल्याला विश्वास असतो.आणी संध्या छाया दाटून आल्या की मग मात्र सगळेच धूसर होत जाते.कुणाच्याही हातांचा आधार पुरेसा वाटत नाही.त्यावेळी कळते की सर्व माणसांचा खरा जिवलग कुणी दुसराच आहे.जीवनाच्या धावपळीत या खऱ्या जिवलगाला आपण पार विसरून गेलो होतो त्याची आतातरी आठवण करू या.गोविंद बोलो बोलो गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाल बोलो. सौ.उषा .
Saturday, 24 September 2011
श्री आज एक सुंदर प्रवचन ऐकायला मिळालं.देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या हा ज्ञानेश्वर माउलीचा हरी पाठातला पहिलाच अभंग .आता आपल्याला काय वाटतं की देवाचे दार म्हणजे देऊळाचे दार पण याचा अर्थ तसा नाईये म्हणे.देवाच दार म्हणजे त्याच नामस्मरण .त्याच नाम घेऊन आपण हळू हळू आपली योग्यता वाढवीत न्यायची इतकी की साक्षात चतुर्भुज नारायण आपल्या समोर उभा राहिला पाहिजे. आणी मग चारी मुक्ती आपल्या समोर हात जोडून उभ्या राहतील असं पुढे माउली आपल्याला आश्वासन देते आहे.आज इतकच. सौ.उषा.
Friday, 23 September 2011
श्री aa एकदा का कळलं की आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय की माणसाला खूप हुरूप येतो.मग कितीही काम पडलं तरी कंटाळा येत नाही.सध्या भागवत ऐकायला मिळतंय आणी सत्संग.आनंदाचे डोही आनंद तरंग.भागवत म्हणजे भक्तांच्या कथा भक्तीच्या कथा आणी मुख्य म्हणजे कृष्ण कथा .कुठल्याही वयाच्या माणसाला आवडेल असं रसाळ अमृत जे कानाच्या वाटे थेट हृदयात उतरते.सगळ्या इंद्रियांना कानांचा हेवा वाटतो आणी कान तरी एकटे कुठे संभाळणार ते बिचारे पटकन हृदयाच्या स्वाधीन करतात आणी मग हृदय रक्तात मिसळून सगळ्या शरीरात हे अमृत पोचवण्याच काम करतं तेव्हा कुठे शांती मिळते.हा आनंद वाटायचाच असतो म्हणून मी हे तुमच्या पर्यंत पोचवण्याच काम केलं.राधारमण गोपालकृष्ण आपणा सर्वाना आनंद आणी निर्मळ शांती देवो ही त्याच्या जवळ प्रार्थना . सौ.उषा.
Tuesday, 20 September 2011
श्री रोजच काहीतरी लिहायचे म्हणजे काही गम्मत नाही.विषय कुठून आणणार पण आता एकदा ठरवलं आहे तर माघार घेणे शक्य नाही.समर्थ म्हणतात न दिसामाजी काहीतरी लिहीत जावे मग ते काहीही असेना का शिवाय माझ्या शिवाय वाचणार तरी कोण मग कसला आलाय संकोच स्वतःच स्वताशी बोलायचं मनात खोलवर दडून बसलेया कितीतरी गोष्टी आपोआपच बाहेर येतील आणी मन होईल निर्मळ ताजं.अस निर्मळ मन असत फक्त लहान मुलांच.देवाजवळ जाण्याकरता असच सुमन हवं न जे देवाला अर्पण करायला जराही संकोच वाटणार नाही. सौ.उषा
Monday, 19 September 2011
श्री पहाटे न उठणाऱ्या किंवा न उठू शकणाऱ्या माणसांची मला नेहेमीच खूप दया येते.आयुष्यातल्या किती मोठ्या आनंदाला ते मुकतात हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल या कल्पनेनी मलाच खूप वाईट वाटत.लालबुंद सूर्याचा गोळा हळू हळू वर येताना बघण्यात जे काय थ्रिल आहे ते स्वतःच अनुभवलेलं बरं.चिऊ चा चिवचिवाट ऐकण्या करता,थंडगार वाऱ्याची झुळूक अनुभवण्या करता आणी तब्बेत चांगली ठेवण्याकरता तरी पहाटे उठा.या पहाटेशी माझं नात फार जुनं आहे अगदी माझ्या जन्मापासून.पहाटे जन्म म्हणून तर उषा नाव ठेवलं न माझं .आजीचं गोड गाणं,गायींच्या गळ्यातल्या घुंगरांचे आवाज, काढल्या जाणाऱ्या दुधाच्या धारेचा आवाज ,ते दुधाचं फेसाळलेल पातेलं,त्याचा तो सुगंध सगळ कसं अगदी आनंद आनंद देणारं. सौ.उषा
Sunday, 18 September 2011
श्री आपल्याला कोण व्हायचे प्रेक्षक की प्रेक्षणीय हे आपण जेवढ्या लवकर ठरवू तेवढे ते आपल्या हिताचे ठरते.लाखो डोळे ज्याच्यावर खिळले आहेत तो सचिन व्हायचे की लाखो प्रेक्षकांपैकी एक ज्याला काहीही विशेष ओळख नाही असा अती सर्व सामान्य माणूस कोण होणार आपण ? अर्थात सचिनची मैदानावरील एखादी बहारदार खेळी बघण्यात निश्चितच एक वेगळाच आनंद आहे.प्रेक्षक म्हणून कधीतरी हा आनंद आपण नक्कीच घेतला पाहिजे पण कायमच का आपण प्रेक्षकाची भूमिका बजावणार ह्याचा मात्र गांभीर्याने विचार करायला हवा.प्रेक्षक असताना पण आपल्यातला विध्यार्थी जागा असला पाहिजे तरच आपण आयुष्यात कधीतरी काहीतरी करून दाखवू शकतो अस मला वाटत . सौ. उषा
Saturday, 17 September 2011
श्री रोज काहीतरी लिहावे म्हणजे भाषा सुधारते आत्मविश्वास वाढतो. स्वताच स्वतःजवळ मन मोकळे केल्यामुळे मनाला एक प्रकारचा तजेला येतो.कुणीही हा प्रयोग करून पाहू शकतो.आपणच आपल्या हातून घडलेले चांगले कमीतकमी शब्दात व वाईट जास्तच जास्त शब्दात लिहून काढावे व आपण स्वतः व आपल्या जवळच्या माणसांना ते वाचून त्यावर टिप्पणी करायला सांगितले असता आपल्या व्यक्तीमत्वात विलक्षण सुधार झाल्याचे आपल्या व इतरांच्याही लक्षात आल्या वाचून रहात नाही...... सौ. उषा
Friday, 16 September 2011
श्री हिशोब आपण सगळेच कमी अधिक फरकात करत असतो .कधी पैशांचा कधी आणखी कसला पण हिशोब म्हंटल की आपल्याला पैशांची बेरीज वजाबाकी पटकन आठवते.हो दुसऱ्यांनी केलेल्या चुका, आपल्यावर इतरांनी केलेले अन्याय आपल्याला अगदी झोपेतून उठविले तरी बिनचूक आठवतात .हा हिशोब कसा अगदी काना मात्र फरक न होता आपण कधीही आठवू शकतो. आपल्याला आठवत नाही फक्त आपल्या चुका आपण दुखवलेली मन .या सगळ्यांचा हिशोब आपण ठेवायला शिकू तेव्हाच माणूस म्हणून एक पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.तेव्हाच आपण सुसंकृत होण्याच्या वाटेवर चालायला लागलो असे समाधान आपण मानू शकतो .
सौ.उषा
Thursday, 15 September 2011
श्री न दिसणारे हात
कितीही ठरवले तरी काही माणसांवर आपण कायम राग धरू शकत नाही.ही ती माणसं असतात ज्यांनी कळत नकळत आपल्याला खूप मदत केलेली असते.त्याचं स्वरूप काहीही असू शकत आर्थिक शारीरिक मानसिक त्यांच आपल्या आयुष्यात काय स्थान आहे हे आपल्याला नेमक सांगता येणारही नाही कदाचित पण याच हातानी आपल्याला कठीण प्रसंगात सावरल हे आपल्या अंतर मनात नोंदल गेलं असत .आपण आपल्याही नकळत त्यांना झुकत माप देत असतो.आपल्या भोवती असणाऱ्या इतर माणसाना त्याची कल्पना नसल्या कारणाने त्यांच्याशी कित्येक वेळा आपला वाद-विवाद पण होतो.तरीही या न दिसणाऱ्या हातांबद्दल आपल्या मनात कायम कृतज्ञ भाव असू ध्या.तो न दिसणारा परमेश्वर ह्याची नक्कीच नोंद घेईल . सौ.उषा
Subscribe to:
Posts (Atom)